VIDEO | नवी मुंबईत बंद पडलेल्या बसेसचं रुपांतर शौचालयात

VIDEO | नवी मुंबईत बंद पडलेल्या बसेसचं रुपांतर शौचालयात

बंद पडलेली बस भंगारात काढली जाते. पण नवी मुंबई महानगरपालिकेने कल्पकतेतून बसचं रुपांतर सुंदर अशा मोबाईल टॉयलेटमध्ये केलंय.  पाहूयात.  कसं आहे हे मोबाईल टॉयलेट.

ही जी बस दिसतेय ती पाहून तुम्हाला ही कसली बस असा प्रश्न पडला असेल ना? ही कसलंही प्रदर्शन असणारी बस आहे किंवा एखाद्या गार्डनमधला देखावा आहे. असा विचार करत असाल तर, मंडळी थांबा. आम्ही तुम्हाला दोखवतोय ती बस आहेच. पण हे आहे चक्क मोबाईल शौचालय आहे.  नवी मुंबई मनपाच्या कल्पकतेतून हे मोबाईल शौचालय साकारलंय. बंद पडलेल्या आणि मुदत संपलेल्या दोन बसचं रुपांतर शौचालयात करण्यात आलंय. सारा प्लास्ट कंपनी आणि ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बस’ साकारली आहे.

बसच्या टपावर पाण्याची टाकी बसवण्यात आलीय. त्याचप्रमाणे बसच्या पुढील भागात महिलांसाठी आणि मागील भागात पुरूषांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृह व्यवस्था करण्यात आलीय. महिलांसाठीच्या भागात तीन शौचकूप असून रूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था करण्यात आलीय. या दोन्ही मोबाईल टॉयलेट बसचं आज लोकार्पण करण्यात आलंय.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com