VIDEO |  नागपूरात रुग्णांना नारळ पाण्यातून दारू

VIDEO | नागपूरात रुग्णांना नारळ पाण्यातून दारू

देवाची करणी आणि नारळात पाणी...आयुर्वेदात नारळपाण्याला खुप महत्व आहे...किडनीचे विकार, सर्दी, खोकला, दमा अशा अनेक आजारांवर नारळपाणी लाभदायी आहे. पण नागपुरच्या शासकीय रूग्णालयात मात्र याच नारळपाण्याच्या नावावर रूग्णांपर्यंत दारू पोहचवली जातीय. आरोग्य मंदिर असलेल्या मेडिकलमध्ये नारळ पाण्यात दारू मिसळून रुग्णांना या शहाळ्यांचा पुरवठा केला जातो.

इथल्या शासकीय रूग्णालयात अनेक रूग्ण भरती होत असतात. यातील मद्यपी रूग्णांची संख्या मोठी आहे. अशा रूगांना दारूची तलब लागली की त्यांचे मित्र, नातेवाईक मदतीसाठी धावून येतात. यासाठी नारळपाण्याचा आधार घेतला जातो. कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीनं हे शहाळं बिनाधास्तपणे रूग्णालयात पोहचवलं जातं.

WebTittle :: VIDEO | Drinking coconut water in patients in Nagpur 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com