VIDEO | निसर्गरम्य माथेरानला निकृष्ट दर्जाच्या कामांची वाळवी....

VIDEO  | निसर्गरम्य माथेरानला निकृष्ट दर्जाच्या कामांची वाळवी....

माथेरान म्हणजे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. दरवर्षी लाखो पर्यटक या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देतात. सध्या माथेरानमध्ये MMRDAच्या माध्यमातून 133 कोटींची विकासकामं सुरू आहेत. मात्र या कामांचा दर्जा पाहिल्यानंतर खरंच ही कामं पर्यटकांच्या सोयीसाठी आहेत की कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी? असा सवाल उपस्थित होतोय. 

माथेरान म्हंटलं की डोळ्यांसमोर येते हिरवाईनं नटलेलं पर्यंटनस्थळ. मातीचे रस्ता आणि नागमोडी वळणं घेत पर्यटकांना स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारी मिनी ट्रेन. माथेरानच्या याच वैभवामुळे दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला आवर्जून भेट देतात. माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी MMRDA नं याठिकाणी तब्बल 133 कोटींच्या कामांना मंजुरी दिलीय. यातील काही कामं प्रत्यक्ष सुरू देखील झाली आहेत. मात्र कामांचा दर्जाबाबत माथेरानकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

आता हेच पाहा. इथं वाहनतळाचं सुशोभिकरण केलं जातंय. त्यासाठी तब्बल 6 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. मात्र अवघ्या काही दिवसातच गटारावरील जाळ्यांची दुरवस्था झालीय. दुरूस्तीसाठी वापरलं जाणारं मटेरियलही सुमार दर्जाचं आहे. 

 MMRDAमार्फत चार पॉइंटचे सुशोभीकरण,महात्मा गांधी रस्ता सुशोभीकरण सुरूंय. मात्र तिथंही नियोजनशून्य कारभार दिसून येतोय. मायरा पॉईंट इथं बसवण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या कधीही कोसळू शकतात. हार्ट पॉईंट रस्त्याला नको तिथे गॅबियन टाकण्यात आल्या आहेत. कामासाठी वापरण्यात आलेला जांभा दगड अत्यंत ठिसूळ आहे. तर अनेक ठिकाणी लावलेल्या रेलिग्जबाबतही शंका उपस्थित होतीय. 

थोडक्यात काय तर माथेरानमध्ये अक्षरशा जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या कामावर ना MMRDA अधिकाऱ्यांचं लक्ष आहे ना नगरपरिषदेचं नियंत्रण. 
पर्यटकांचे गाल. ठेकेदार मात्र मालामाल असंच चित्र सध्यातरी माथेरानमध्ये पाहायला मिळतंय. 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com