VIDEO | महाराष्ट्रात कोरोनाची भीती

VIDEO |  महाराष्ट्रात कोरोनाची भीती

कोरोना व्हायरसचा धसका आता राज्यातही घेतला जातोय. दिवसभरातल्या 2 घटनांनी महाराष्ट्रही कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली आहे. सिंधुदुर्गातलया रेडी बंदरात चीनमधनं जहाज दाखल झालंय. रेडी इथं लोह खनिज नेण्यासाठी चीनमधनं हे जहाज दाखल झालंय. 22 चिनी प्रवासी या जहाजातनं सिंधुदुर्गात दाखल झालेत.

तर पुण्यात एका चिनी प्रवाशाला नायडू रुग्णालयात दाखल केल्यानं दहशत पसरलीय. दिल्ली-पुणे विमानात हा चीनी प्रवासी होता. प्रवासादरम्यानं या चीनी प्रवाशानं उलटी केल्यानं त्याला पुण्यात तात्काळ उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
कोरोना व्हायरसमुळे 600 हून अधिक रुग्णांना चीनमध्ये प्राण गमवावे लागलेत. हा व्हायरस वेगानं पसरतोय. त्यातच आता सिंधुदुर्ग आणि पुण्यात चिनी नागरिकांमुळे भीतीचं वातावरण पसरलंय.

WebTittle :: VIDEO | Fear of Corona in Maharashtra


 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com