VIDEO | पाकिस्तानाच्या या युनिव्हर्सिटीत दिलं जातं जिहादी प्रशिक्षण

VIDEO | पाकिस्तानाच्या या युनिव्हर्सिटीत दिलं जातं जिहादी प्रशिक्षण

आता बातमी पाकिस्तानातील अशा एका युनिव्हर्सिटीची जिथं खुलेआम जिहादी प्रशिक्षण दिलं जातंय. विशेष म्हणजे या 'युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद'ला पाकिस्तान सरकारचाही पाठिंबा आहे

अगदी दाटीवाटीनं जागा मिळेल तिथं बसलेले शिक्षणार्थी. प्रत्येकाचं बारीक लक्ष शिकवणाऱ्या शिक्षकाकडेच कारण इथं खुलेआम दिलं जातंय दहशवादाचे प्रशिक्षण.  पेशावर पासून 60 किमीवर अकोरा खट्टक परिसरातील दारुल उलूम हक्कानिया नावाचा हा मदरसा युनिव्हर्सिटी ऑफ जिहाद म्हणून ओळखला जातो.

या ठिकाणी 4 हजारहून अधिक मुलं शिक्षण घेत आहेत. यामध्ये अनेक पाकिस्तानी, अफगाणि शरणार्थींचा समावेश आहे..या सर्वांची मोफत राहण्याची, जेवणाची सोय केली जातेय.

दहशतवादी तयार करणारी ही फॅक्टरी पाक सरकारच्या पाठिंब्यावर सुरु आहे. आतापर्यंत अनेक  जिहादी या मदरशातून बाहेर पडलेत. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे मारेकरीही याच जिहादी युनिव्हर्सिटीची देणं असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच या मदरशाच्या नेत्यांनी तालिबानी दहशतवाद्यांचे समर्थन करणार एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर हा मदरसा चर्चेत आला. मग नेहमी प्रमाणे मदरशात दहशतवादाचे किंवा युद्धाचे प्रशिक्षण दिले जात नसल्याचा कांगावा मदरशाच्या नेत्यांनी केला. मदरशाचं स्पष्टीकरण म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबाच 


 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com