VIDEO | मोदी सरकार शोधतेय औरंगजेबाच्या भावाची कबर

 VIDEO | मोदी सरकार शोधतेय औरंगजेबाच्या भावाची कबर


नवी दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदलल्यानंतर केंद्र सरकारनं एक नवी मोहिम हाती घेतलीय ती म्हणजे दारा शुकोची कबर शोधून काढण्याची...दारा शुकोव्ह म्हणजे मुघल सम्राट औरंगजेबाचा भाऊ...औरंगजेब बादशाहानं अत्यंत क्रुरपणे आपल्या भावाची हत्या केल्याची इतिहासात नोंद आहे. असं म्हणतात दारा शुको कडवा हिंदुस्थानी होता. उदरमतवादी असलेला दारा शुको हिंदुस्थानचा सम्राट असता तर कदाचित आज या देशाचं वेगळं चित्र असतं. याच दारा शुकोची कबर शोधून काढण्यासाठी पुरातत्व विभागानं एक समितीही नेमलीय. 

दिल्लीतील हुमायु समाधी परिसरात मुघल घराण्यातील 104 जणांच्या सदस्यांचे थडगे आहेत. यामध्ये दारा शुकोव्ह यांची जी कबर आहे, ती कबर दाराचीच आहे, याला पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे सबळ ऐतिहासिक पुराव्यानिशी दाराची खरी समाधी शोधून काढणं हे नियुक्त समितीसमोर एक मोठे आव्हान आहे.

आता या नव्या शोधावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. औरंजेबाच्या भावाची कबर उकरून नक्की काय मिळणार? मात्र, याचं उत्तर सध्या कुणाकडेच नाही. शिवाय मोदी सरकारनं ज्या उद्देशासाठी हे काम हाती घेण्यास लावलंय. त्यात मोदी सरकार यशस्वी होईल का हे पहावं लागेल.

WebTittle ::  VIDEO | Modi government seeks Aurangzeb's brother's grave


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com