VIDEO| बाबासाहेबांच्या स्मारकाची प्रतीक्षा अखेर संपली

VIDEO| बाबासाहेबांच्या स्मारकाची प्रतीक्षा अखेर संपली


गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेलं दादरच्या इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरच मार्गी लागण्याची चिन्हं आहेत...10 ऑक्टोबर 2015  रोजी या स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं..मात्र, त्यानंतर अद्याप तिथं काहीही काम झालेलं नाही..
या स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढवली जाणाराय..त्यामुळे हा पुतळा 350 फूट उंचीचा होईल. हा पुतळा कांस्य धातूचा असेल..चबुतऱ्याची उंची 100 फूट असेल..इंदू मिलच्या सुमारे 125 एकर जागेत हे स्मारक उभारण्यात येणाराय...या स्मारकासाठी 1089 कोटी 95 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीय..या स्मारकात महाडच्या चवदार तळ्याची प्रतिकृती असेल.. 

स्मारकाची इमारत ग्रीन बिल्डिंग प्रकारातली असेल. या ठिकाणी वेगवेगळी सभागृहं असतील. या स्मारकात संशोधनाची सोय असेल. महत्त्वाचं म्हणजे एक उच्च दर्जाचं ग्रंथालय या स्मारकात उभारलं जाईल..स्मारक उभारताना निसर्गाची हानी होऊ देणार नाही, याचीही ग्वाही अजित पवारांनी दिलीय..

हा प्रकल्प केवळ एक पिकनिक स्पॉट होऊ नये..जगभरातल्या संशोधकांना अभ्यासासाठीचं एक उत्तम केंद्र व्हावं, अशी अपेक्षा सरकारच्या घोषणा पाहता केली तर चुकीचं ठरू नये..


WebTittle :: The wait for Babasaheb's memorial was finally over

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com