VIDEO| पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय ?

VIDEO| पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय ?

करणी, भानामती, काळी जादू असे प्रकार अलिकडच्या काळात वाढीस लागलेत. लोणावळा आणि मांढरदेवी ही त्याची ढळढळीत उदाहरणं...हे कमी होतं म्हणून की काय सुसंस्कृत पुण्यात अशाच अंधश्रद्धेतून एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीय. पुण्यातल्या पेरणे फाटा इथं राहणाऱ्या एका महिलेच्या पतीनं राहुल वाळके नावाच्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. त्याचाच गैरफायदा घेत वाळकेनं महिलेशी ओळख वाढवली आणि जादुटोण्याचा वापर करत गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकच नाही तर आरोपीनं महिलेला मारहाण करण्यासोबत तिचा गर्भपात केल्याचा आरोपही पीडितेनं केलाय. 

या गंभीर प्रकारानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.  हे प्रकरण पोलिसांनी योग्यरित्या हाताळलं नसल्याचा आरोपही पीडितेनं केलाय. तर योग्यरित्या तपास केला जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलंय. विशेष म्हणजे एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असताना देखील आरोपीला जामीन मंजूर झालाय. एकीकडे देश विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती करतोय. अशातही जादुटोणा, काळी जादू यासारख्या प्रकारांमधून एखाद्या महिलेवर अत्याचार होत असतील तर ही दुदैवी बाब म्हणावी लागेल.

WebTittle :: What is going on in progressive Maharashtra?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com