अडीच महिन्यात येणार कोरोनावर रामबाण लस? अडीच महिन्यात तयार होणार ऑक्सफर्डची लस?

अडीच महिन्यात येणार कोरोनावर रामबाण लस? अडीच महिन्यात तयार होणार ऑक्सफर्डची लस?

ऑक्सफर्डची कोरोना लस अडीच महिन्यात तयार होईल, अशी चर्चा आहे. पुढच्या वर्षीपर्यंत ही लस प्रत्यक्ष बाजारात उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे.

कोरोना लसींबाबतीत ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस सर्वात प्रबळ दावेदार मानली जातेय. ऑक्सफर्डच्या लसीकडून साऱ्या जगाला अपेक्षा आहे. अवघ्या अडीच महिन्यात ही लस येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळतेय. 2020 च्या शेवटापर्यंत ऑक्सफर्ड लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी होऊ शकतात, अशी आशा निर्माण झालीय. पण लस येण्यासाठी प्रत्यक्ष 2021 उजाडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

ब्रिटन सरकारच्या व्हॅक्सिन टास्कफोर्सप्रमुख केट बिंघम यांनी नाताळपूर्वी ऑक्सफर्डची लस येण्याची शक्यता फेटाळलीय. ब्रिटनव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये या लसीची चाचणी पुन्हा सुरु झालीय पण सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेत या लसीची चाचणी थांबण्यात आलीय. 2020 पर्यंत सर्व ठिकाणांची चाचणी यशस्वी पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे 2021 च्या सुरुवातीला ऑक्सफर्डची लस येण्याची शक्यता निर्माण झालीय. 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com