कर्ज फेडण्यासाठी तरूण उद्योजक बनले चोर,

कर्ज फेडण्यासाठी तरूण उद्योजक बनले चोर,

एकिकडे कोरोनाचा जबर फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेला असतानाच नागपूरातून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. कर्जफेडीसाठी दोन 
नव-उद्योजकांनी चक्क चोरीचा मार्ग पत्करलाय.


कोरोना संकटकाळात उद्योजकांचं मोठं नुकसान झालंय.या संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उद्योजकांची धडपड सुरू असतानाच काही नवउद्योजकांनी चक्क चोरीचा मार्ग अवलंबलाय.

नागपूरमध्ये आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी ध़डपडणाऱ्या दोन व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट कोसळल्यामुळे दुचाकी चोरीचा मार्ग पत्करलाय. याप्रकरणी मोनिश ददलानी आणि सेवक गुमनानी या दोघांना अटक करण्यात आलीय.त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्यात. 

लॉकडाऊनच्या काळात अनेकांसमोर अडचणी उभ्या ठाकल्यात. अनेकांनी या संकटासमोर मान तुकवली तर अनेकांनी या संकटाशी झुंज सुरूच ठेवलीय. पण नागपूरच्या या हतबल नवउद्योजकांनी निवडलेला हा मार्ग चिंतेत भर घालणारा आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com