आंबेनळी घाटात एसटी बस कोसळली,15 प्रवासी जखमी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

 एसटी बस मुक्कामी महाडला असते. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटातून ही बस खाली गेली. पण खाली कोसळलेली ही बस झाडात अडकली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला आहे.

 

सोलापूर : महाड येथून अक्कलकोटला येणारी एसटी बस आंबेनळी घाटात कोसळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना महाबळेश्‍वर परिसरात घडली. अपघातानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

ही एसटी बस मुक्कामी महाडला असते. प्रतापगडपासून पोलादपूरला जाणाऱ्या घाटातून ही बस खाली गेली. पण खाली कोसळलेली ही बस झाडात अडकली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवाशांचा जीव वाचवला आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: ST bus collapsed in Ambenali Ghat


संबंधित बातम्या

Saam TV Live