BREAKING | एसटी बसने प्रवास करणाऱ्यांनो सावधान!

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 21 जानेवारी 2020

आता बातमी एसने प्रवास करणाऱ्यांना सतर्क करायला लावणारी....तुम्ही जर एसटी बसने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुम्ही पाहिलीच पाहिजे.. एसटी आगारात बसमध्ये जागा मिळवण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. रुमाल टाकून जागा अडवण्याची शक्कल तर फारच जुनी आहे. पण एका प्रवाशाने रुमालाऐवजी चक्क बॅगच खिडकीतून बसच्या आत टाकली आणि जागा रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न या प्रवाशांच्याच अंगाशी आलाय. कारण एसटी आगारात सीटवर ठेवलेल्या बॅग सर्रासपणे लंपास केल्या जात असल्याचं समोर आलंय. याबाबतचं सीसीटीव्ही देखील समोर आलंय.

चार जणांची साखळी ही चोरी करताना पाहायला मिळतेय. एकमेकांना खूणावून चक्क खिडकीतूनच हात टाकत प्रवाशांच्या बॅगा लंपास होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नंदुरबारमधील हा प्रकार असला, तरी राज्यातील सर्वच ठिकाणच्या प्रवाशांनी काळजी घेणं आवश्यक आहे.  सध्या या चोरट्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. मात्र हे धक्कादायक सीसीटीव्ही समोर आल्यानं साम टीव्ही प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करतंय. 

WebTittle: ST bus passengers beware!

संबंधित बातम्या

Saam TV Live