नोकरी एसटीची आणि चाकरी दुसऱ्याची! वाचा, आर्थिक चणचणीमुळे एसटी महामंडळाचा हा प्रस्ताव

साम टीव्ही
रविवार, 11 ऑक्टोबर 2020
  • एसटीच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या नोकरीची मुभा
  • आर्थिक चणचणीमुळे एसटी महामंडळाचा प्रस्ताव
  • दुसऱ्या नोकरीच्या काळात बिनपगारी रजा

एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाय केले जातायत. याच उपायांचा भाग म्हणून एक नवा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. हा प्रस्ताव मंजूर झाला तर एसटीच्या कर्मचाऱ्यांची अवस्था. नोकरी एसटीची आणि चाकरी दुसऱ्याची, अशी होणारेय.

कोरोनाच्या काळात मोठं नुकसान झाल्याने एसटीची चाकं रुतून बसलीयत. आर्थिक चणचणीमुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणंही महामंडळाला अशक्य झालंय. त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी इतर खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची मुभा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय.

पाहा व्हिडिओ -

काय आहे प्रस्ताव?
सेवेत असताना कर्मचाऱ्यांना इतर खासगी कंपन्यांत सहा महिने ते पाच वर्षे नोकरी करता येईल. त्यासाठी एसटी महामंडळाकडून विनावेतन रजाही मंजूर केली जाईल. खासगी नोकरी आवडल्यास कर्मचारी एसटीतील नोकरीचा राजीनामा देऊ शकतो. राजीनाम्यानंतर त्याला भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी वगैरे भत्तेही मिळतील. खासगी कंपनीतील नोकरी न आवडल्यास एसटीत पुन्हा रुजू होण्याची मुभा देण्यात येणार. एसटीत आधी जेवढी वर्ष सेवा केलीय, तीच वर्ष ग्राह्य धरुन कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेला सुरुवात करता येईल.

एसटीची आर्थिक अवस्था सुधारण्यासाठी अनेक पावलं उचलली जातायत. हा प्रस्तावही त्याचाच भाग आहे. मात्र, या प्रस्तावामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होता कामा नये, तो रस्त्यावर येता कामा नये याची काळजी घ्यायला हवी.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live