विधानसभेसाठी अर्ज भरण्यासाठी  पुढील आठवड्यात सुरूवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढील आठवड्यात प्रारंभ होणार असून, या आठवड्याच्या अखेरीला निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 25 सप्टेंबर ते एक ऑक्‍टोबर हा कालावधी असण्याची शक्‍यता आहे. मतदान 19 ते 21 ऑक्‍टोबरदरम्यानच्या तारखेला होईल. दिवाळीपूर्वी मतमोजणी होऊन नवीन आमदार विधीमंडळात प्रवेश करतील. 

नवरात्राचा प्रारंभ 29 सप्टेंबरला (रविवारी) होणार आहे. त्यामुळे, उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी त्यानंतर दोन दिवस मुदत राहण्याची शक्‍यता आहे. गेल्या निवडणुकीतही घटस्थापनेनंतर दोन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी होती. घटस्थापनेच्या दिवशी गेल्या वेळी युती व आघाडी यांची ताटातूट झाली व चारही पक्ष स्वतंत्रपणे लढताना अनेक मतदारसंघांत उमेदवारांची शोधाशोध सुरू झाली होती. यंदा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी झाली आहे, मात्र, भाजप-शिवसेना युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर, अर्जांची छाननी, माघार यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो. त्यानंतर किमान 14 दिवसांनी मतदान होते. हे लक्षात घेतल्यास, 19 ते 21 ऑक्‍टोबरदरम्यान मतदान होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ आज राज्यात आले असून, या आठवड्याच्या अखेरीला निवडणूक तारखांची घोषणा होईल आणि आचारसंहिता लागू होईल. 
 
Web Title: Starting next week to fill out an application for the Legislative Assembly

संबंधित बातम्या

Saam TV Live