स्टेट बँकेची सीबीआयकडे तक्रार

स्टेट बँकेची सीबीआयकडे तक्रार

कर्नाल जिल्ह्यात या कंपनीच्या तीन राइस मिल आहेत, तर आठ निवड आणि प्रतवारीचे युनिट आहेत. व्यापारासाठी सौदी अरेबिया आणि दुबईत कंपनीची कार्यालये आहेत, असे 'एसबीआय'ने तक्रारीत म्हटले आहे. 'एसबीआय'शिवाय कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि कॉर्पोरेशन बँक यांचा कन्सोर्टियममध्ये समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सीबीआयने या प्रकरणी कोणतेही छापे घातलेले नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पश्चिम आशिया आणि युरोपातील देशांत बासमती तांदूळ निर्यात करणारी ही कंपनी आणि तिचे संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार आणि संगीता यांच्याविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बँकेचे १७३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 
सहा बँकांची सुमारे ४११ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेले 'राम देव इंटरनॅशनल'चे तीन प्रवर्कत देशाबाहेर पळून गेले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल करण्यापूर्वीच या तिघांनी देशाबाहेर पलायन केल्याचे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.


'चौकशी केली असता कर्जदार फरारी असून, त्यांनी देश सोडल्याचे समोर आले आहे,' असे २५ फेब्रुवारी २०२० पूर्वी दाखल तक्रारीत म्हटले आहे. खाते 'एनपीए' झाल्यानंतर चार वर्षांनी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्जदारांनी जुन्या प्रकल्पातून सर्व यंत्रसामग्री हटवली आहे, तसेच बनावट ताळेबंद दाखवून बँकांची फसवणूक केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. आरोपी हजर झाले नाहीत, तसेच त्यांनी तपासात सहकार्य केले नाही, तर त्यांना समन्स बजावण्याची प्रक्रिया सीबीआय सुरू करेल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. 'एसबीआय'ने दिलेल्या तक्रारीनुसार या संदर्भातील खाते २७ जानेवारी २०१६ पासून 'एनपीए' आहे. बँकांनी संबंधितांच्या मालत्तांचे ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये परीक्षण केले होते.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com