राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबरला

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसात विस्तार होईल, आणि या खात्यांना पूर्णवेळ मंत्री मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार 23 किंवा 24 डिसेंबरला मुंबईत विस्तार होईल असा कयास होता. प्रत्यक्षात बुधवारीही विस्तार होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आठव़ड्याअखेर  विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असून त्यात ८ राज्यमंत्र्यांचाही समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं.काँग्रेसच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन चव्हाणांसाठी काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडली आहे. त्यातील पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेश काँग्रेसची जबाबदारी द्यावी आणि अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या निर्णयाप्रत काँग्रेसश्रेष्ठी आलेले आहेत. 

मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार थेट 30 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. परिणामी, आणखी काही दिवस तरी मुख्यमंत्र्यांना सहा मंत्र्यांच्या सहकार्याने राज्यकारभार करावा लागणार आहे.  

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगेे्रस या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांनी उद्धव यांच्यासोबत पदाची शपथ घेतली होती. शपथ घेतल्यानंतर खातेवाटपासाठी आणखी चौदा दिवस लागले होते. पक्षांचे खातेवाटप झाल्यानंतर एकेका मंत्र्याकडे सात-आठ-दहा खाती देण्यात आली आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर दोन दिवसात विस्तार होईल, आणि या खात्यांना पूर्णवेळ मंत्री मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार 23 किंवा 24 डिसेंबरला मुंबईत विस्तार होईल असा कयास होता. प्रत्यक्षात बुधवारीही विस्तार होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. 

महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण हेही दिल्लीत जाउन बसले आहेत. महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे कायम राहणार असून महिला आणि बाल विकास खाते यशोमती ठाकूर किंवा वर्षा गायकवाड यांच्याकैकी एकीस मिळण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घेण्याऐवजी त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्याचा विचार हाय कमांडने चालवला असन त्यास अंतिम स्वरूप येण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची यादी तयार झाली असून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि नितीन राऊत हे कालपसूनच दिल्लीत जाऊन बसले आहेत. अशोक चव्हाण यांना  मंत्रीपद देण्यास पक्षश्रेष्ठी तयार झाले असून उर्जा किंवा सार्वजनिक बांधकाम यापैकी एक खाते त्यांना मिळू शकते. 

WebTittle: State Cabinet expands on December 30


 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live