राज्य सरकार दारू विक्रेत्यांकडून 'मेवा' खातंय- गोपीचंद पडळकर 

विजय पाटील
गुरुवार, 27 मे 2021

वसुली सरकारमधील मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ हा जास्तीचा महत्वाचा आहे.

वसुली सरकारमधील मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ हा जास्तीचा महत्वाचा आहे. चंद्रपुरातील दारू सुरू करणाऱ्या या राज्य सरकारचा धिक्कार आणि निषेध भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.  ते सांगलीच्या झरेमध्ये बोलत होते. या राज्य सरकारला जाहीरपणे विचारतो, ‘मेवा’ मिळत नसेल म्हणून तुम्ही बहुजनांचे हक्क मंत्रीमंडळात मांडत नसाल.  तर मी  माझ्या बहुजन बांधवांकडून लोकवर्गणीने आपल्यासाठी ‘मेवा’ जमा करण्याचे अवाहन करू शकतो. जेणेकरून तुम्ही बहुजनांच्या हक्कासाठी मंत्रीमंडळात आडाल आणि लढाल. वसुलीकरिता बहुजनांचे हक्क गहाण ठेवणाऱ्या वसुली सरकारचा मी धिक्कार करतो. असे वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले.(State government eats 'nuts' from liquor sellers Gopichand Padalkar)

 हे देखील पाहा 

दरम्यान, गोपीचंद पडळकर नेहमीच धनगर आरक्षणासाठी सक्रिय असतात. राज्य सरकारला ते नेहमी प्रश्न विचारात असतात. मध्यंतरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या परीक्षा पुढे ढकलण्यात  होत्या तेव्हा गोपीचंद पडळकर रस्त्यावर बसून आंदोलन केले होते. त्यांनतर त्यांना अटक देखील झाली होती. जेजुरी गडावर आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण पडळकर यांनी रात्रीच केले होते.


संबंधित बातम्या

Saam TV Live