विवेक पाटलांना महाविकास आघाडी सरकार वाचवतंय - किरीट सोमय्या

Kirit Somaiya - Vivek Patil
Kirit Somaiya - Vivek Patil

रायगड :  कर्नाळा बँक प्रकरणात गुन्हा दाखल होवून दीड वर्ष  झाले तरी अद्याप विवेक पाटील यांना अटक केली नसून महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप भाजपा BJP नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी केला आहे. State government saving former MLA Vivek Patil allegations of Kirit Somaiya 

रायगड Raigad जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली कर्नाळा अर्बन बॅकेला दोन वर्षापुर्वी टाळे लागले. कर्नाळा बॅकेत512 कोटी 54 लाख 53 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याने बँकेची स्थिती डबघाईला आली होती. संचालकांनी व अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कर्ज वाटप करून बॅंक बुडीत खात्यात घालविण्यासाठी कारणीभूत ठरल्या प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे माजीआमदार विवेक पाटील Vivek Patil यांच्यासह 76 जणांवर पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पनवेल Panvel मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी हा आरोप केला आहे. ५२५ करोड रूपये खाणाऱ्या विवेक पाटलांची संपत्ती का जप्त केली जात नाही ? असा सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

दरम्यान,  कर्नाळा सहकारी बँक अपहार प्रकरणी सहकार विभागाने अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या खाजगी आणि व्यवसायिक स्वरूपाची वाहने जप्त Vehicles confiscated करण्यात आली आहेत. सहकार विभागाच्या कारवाईनंतर राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागानेही CID या प्रकरणात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँक मर्यादीत या बँकेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार scam झाल्याच्या तक्रारीनंतर रिझर्व बँकेने RBI 2018 मध्ये सदर बँकेची तपासणी केली होती. सदर तपासणीत अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या होत्या. त्यावर अधिक चौकशी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सहकार आयुक्तांना या बँकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याचे आदेश दिले होते. बँकेचे ठेवीदार आणि शासनाची फसवणुक केल्याचे तेव्हा निदर्शनास आले होते. State government saving former MLA Vivek Patil allegations of Kirit Somaiya 

यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष लेखा परीक्षक उमेश तुपे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी अफरातफर, बनावटगिरी त्याचप्रमाणे सहकारी संस्था अधिनियम कलम 147 सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम कलम 3 अन्वये 76 जणांवर  गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com