या राज्याला आरोग्याची नाही तर दारूची गरज - सदाभाऊ खोत

विजय पाटील
गुरुवार, 13 मे 2021

जेष्ठ नेते शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानात गंभीर बाब घातली आहे. दारू दुकानदार, बार चालक, मोठ्या संकटात सापडला आहे.त्यामुळे त्यांना प्राधान्याने मदत केली पाहिजे. या राज्याला गरज आरोग्याची नाही तर दारूची गरज आहे. अशी खोचक टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

सांगली : जेष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar साहेबांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या कानात गंभीर बाब घातली आहे. दारू दुकानदार, बार चालक, मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्याने मदत केली पाहिजे. या राज्याला गरज आरोग्याची Health नाही तर दारूची Alcohol गरज आहे. अशी खोचक टीका आमदार सदाभाऊ Sadabhau Khot खोत यांनी केली आहे. State Needs Alcohol not Health ; Sadabhau Khot

लॉकडाऊन झाले तेव्हापासून त्याचा बळी शेतकरी Farmer ठरत आहे. शेतकऱ्याचा भाजीपाला रस्त्यावर आणि शेतात पडून आहे. कांदा घरात सडू लागला आहे. राज्य सरकार मदत करायला तयार नाही. शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. पवार साहेबांना विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवा शेतकऱ्याला गांजा लावण्याची परवानगी द्या आणि मेहरबानी करा मगच बळीराजा कर्जमुक्त होईल. असा टोला सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. 

हे देखील पहा -

मराठा आरक्षणाचा सावळा गोंधळ राज्य सरकार सातत्याने करत आहे. एसईबीसी मुलांच्या निवडी ग्राह्य धरल्या आहेत मात्र नियुक्ती प्रमाणपत्र राज्य सरकार देत नाही अशी टिपण्णी देखील त्यांनी केली. तुम्ही मराठा समाजातील युवकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही. State Needs Alcohol not Health ; Sadabhau Khot

पोलीस उपनिरीक्षक परीक्षार्थींना प्रशिक्षणास पाठवणार

प्रस्थापित राज्यकर्ते विस्थापित मराठ्यांना विरोध करत आहेत असे देखील खोत म्हणाले. निवड झालेल्या मात्र अद्यापही नियुक्ती प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाजातील युवकांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण पत्र दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live