लवकरच राज्याचे नवे जलधोरण जाहीर होणार 

लवकरच राज्याचे नवे जलधोरण जाहीर होणार 

औरंगाबाद - नाशिक, नगर जिल्‍ह्यांतून पाण्याची आवक झाल्याने मराठवाड्याची जलवाहिनी असलेले जायकवाडी धरण भरले आहे. रविवारी धरणात ९९.२८ टक्के पाणीसाठा होता.
पुणे - राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती देण्यात आली आहे. पूर व अवर्षणाची समस्या हाताळण्याबरोबरच आता पाण्याची उत्पादकता वाढविण्याचे ध्येय नव्या धोरणात ठेवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राची जलनीती २०१९’मध्ये तयार झालेल्या नव्या जलधोरणानुसार जलआराखडे तयार होती. महाराष्ट्र जल मंडळ व राज्य जल परिषदेच्या मान्यतेशिवाय या आराखड्यांमधील कामे करता येणार नाहीत.

राज्याचे जलधोरण २००३ मध्ये तयार करण्यात आले होते. वाढते शहरीकरण, औद्योगिकरण; तसेच धोक्यात आलेले सिंचन या समस्यांचा विचार न करताच धोरणाची अंमलबजावणी सुरू होती. २०११ मध्ये धोरणाचा आढावा घेतला गेला. मात्र, फारसे बदल झाले नव्हते. २०१२ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय जलधोरण जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या जुनाट जलधोरणाचा आढावा घेणे आवश्यक होते. तथापि, त्याकडे दुर्लक्ष झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्याची पहिली जलनीती २००३ मध्ये तयार झाली होती. त्यानंतर २०१२ मध्ये केंद्र शासनाने देशाची जलनीती तयार केली. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाशी सुसंगत जलधोरण महाराष्ट्राने देखील तयार केले आहे. नवे जलधोरण अधिक सुसंगत,व्यापक आणि लवचिक आहे.
- राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग

Web Title: State New Water Policy Declare

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com