राज्यात आता कोरोना संपेपर्यंत निवडणुका घेऊ नये, राजू शेट्टींची मागणी 

raju shetti
raju shetti

सांगली : निवडणूकीमूळे Election कोरोना Corona वाढत आहे. हे स्पष्ट असून आता राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेऊ नये. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetakari Sanghtna  माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत प्रशासन सुस्त असून रूग्णांवर उपचार आणि त्यांना  बरे करण्याचे सोडून केंद्र Central Government आणि राज्य सरकार State Government एकमेकांवर आरोप करत असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते सांगली Sangali मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. State should not hold elections till Corona ends demands former MP Raju Shetty 

कोरोनाच्या परिस्थितीवरून राजू शेट्टी यांनी केंद्राने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या कोरोना रूग्णांवर उपचार करणे किंवा त्यांना बरे करणे या पेक्षा राज्य सरकार केंद्रावर तर केंद्र सरकार राज्य सरकारवर आरोप करत आहे.

आज राज्यात रेमडीसिवरचा Remedisivir तुटवडा आहे. त्यामुळे काळाबाजार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला लसीसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे. तर गत वर्षाच्या लाटे पेक्षा दुसरा लाटेत प्रशासन अधिक सुस्त झाले आहे. आज सामाजिक संस्था कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र आरोग्य विभाग काय करत आहे ? असा सवाल राजू शेट्टी यांनी बोलताना उपस्थित केला आहे. 

हे  देखल पहा -

पंढरपूरच्या पोट निवडणुकीवरून Pandharpur by assembly elections ते म्हणाले निवडणूकित हार-जित चालत राहते. पण या निवडणुकीमुळे सोलापूर Solapur जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आलेले आहे. एकूणचं ज्या- ज्या ठिकाणी निवडणूक झालेल्या आहेत, त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक झालेला पाहायला मिळाला असल्याचं समोर आलेला आहे.

कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यातील गोकुळची निवडणूक असू दे किंवा पोटनिवडणुका असो. त्यामुळे राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या निवडणुका कोरोनाची प्रादुर्भाव थांबल्या शिवाय घेऊ नये. अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली मध्ये केली आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com