1 जूननंतरही लाॅकडाऊन राहणारच..राजेश टोपेंचं सुतोवाच

rajesh tope
rajesh tope

मुंबई - कोरोना Corona विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध लागू राहणार की नाही याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत cabinet meeting चर्चा झाली. राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला. The state will not lift the lockdown even after June 1

हे देखील पहा -

त्यासोबतच राज्यातील रिकव्हरी रेट वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घाट झाली आहे. राज्यात सरसकट लॉकडाऊन Lockdown उठवता येणार नाही अशी माहिती राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे.

सध्या आहे त्या निर्बंध काही ठिकाणी शिथील करण्याचा विचार झाला असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल करण्याच्या संदर्भात दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.The state will not lift the lockdown even after June 1

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की, राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतरही सरसकट उठवता येणार नाही मात्र, काही ठिकाणी जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  

तसेच  येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाऊन संदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल अशी माहित देण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबत सर्व मंत्र्यांचे  लॉकडाऊन लगेच काढणे शक्य नाही, यावर एकमत झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com