'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची लिफ्ट पडली बंद

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची लिफ्ट पडली बंद

अहमदाबाद : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला महिनाही झाला नसताना आता या स्मारकात असलेली लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट बंद पडल्याने या लिफ्टमध्ये असलेले लोक आतमध्ये अडकले. यामध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी होते.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चा लोकार्पण सोहळा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. जगातील सर्वात उंच असा हा पुतळा पाहण्यासाठी देशभरातून लोक येत आहेत. सुशीलकुमार मोदी यांच्यासह गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल आणि काही अधिकाऱ्यांनी या स्मारकाला भेट दिली. हे सर्वजण पुतळ्यामध्ये असलेल्या लिफ्टने ह्युईंग गॅलरीत जात होते. मात्र, त्याचदरम्यान ही लिफ्ट बंद पडली. अचानक लिफ्ट बंद पडल्याने मोदींसह काही लोक लिफ्टमध्ये अडकले होते. 

दरम्यान, लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्याने ही लिफ्ट अडकली होती. मात्र, या लिफ्टमधील काही लोक बाहेर पडल्यानंतर ही लिफ्ट पुन्हा सुरु झाली, अशी माहिती 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या अधिकाऱ्यांनी दिली.
 

Web Title: Statue of Unitys Lift gets technical fault, Sushilkumar Modi stuck in the lift
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com