शेअर बाजारात तेजीचा वर्षाव, बाजार उघडताच 559 अंकांची उसळी

साम टीव्ही
बुधवार, 3 जून 2020

 

  • शेअर बाजारात तेजीचा वर्षाव
  • बाजार उघडताच सेन्सेक्सची 559अंकांची उसळी
  • सेन्सेक्सने ओलांडली 34 हजारांची पातळी
  • निफ्टीतही उसळी, 10 हजारांच्या पार
  • बाजार उघडताच 559 अंकांची उसळी

मुंबईवर चक्रीवादळाचे संकट घोंघावत असले तरी, शेअर बाजारात तेजी दिसून येतीय. सेन्सेक्सने ३४ हजारांची पातळी ओलांडलीय. गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स 559 अंकांनी उसळला. तर निफ्टीही तेजीत आला. आणि निफ्टीनं 10 हजारांचा टप्पा गाठला. आजपासून लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टिनं पावलं उचलली जाणारंयत. यामुळे भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

त्यातच आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये आज सकारात्मक वातावरण दिसून आलं. चलन बाजारात आज आशियातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरलं. त्याचाही परिणाम भांडवली बाजारावर जाणवला.

दरम्यान, पुण्यात गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे तब्बल बावीस जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलंय. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनाचे तीनशे सदुसष्ठ बळी गेलेत. तसेच तिनशे आठ नव्या कोरोनारुग्णांचीदेखील भर पडलीय. सद्य स्थितीत पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे आठ हजार एकशे चौतीस रुग्ण आहेत. 

यासोबतच, एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात कोरोनावरची लस आता लवकरच उपलब्ध होऊ शकते. कारण पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आणि  या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतूनच देण्यात येणार आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येणार आहे. यासाठी 30 माकडे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. 


संबंधित बातम्या

Saam TV Live