VIDEO | अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारात घसरण

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

मुंबई : आज पहिल्यांदाच शेअर बाजार सुरु राहणार आहे.शेअर बाजार सुरु होताच निर्देशांकात १५० अंकांची घरसण झाली. निफ्टी ५० अंकांनी घसरला होता. प्री ओपनिंगला सेन्सेक्सने ६०० अंकांची घसरण झाली होती. निफ्टी १२० अंकांनी कोसळला होता. मात्र जसजशी बजेट सादर करण्याची वेळ जवळ येत आहे तसा बाजाराचा मूड बदलत आहे. 

आज स्थावर मालमत्ता, उत्पादन क्षेत्र, एफएमसीजी यासह कृषी आणि वित्त संस्था , बँकांच्या शेअरवर नजर राहणार आहे. आर्थिक पाहणी अहवाल सादर झाल्यानंतर शुक्रवारी सेन्सेक्स १९०.३३ अंकांनी खाली आला, तर निफ्टीमध्ये ७३.७० अंकांची घसरण झाली होती. आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी भांडवल बाजाराची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अर्थसंकल्पानंतर अर्थव्यवस्थेला अच्छे दिन येतील, आणि बाजार उसळी घेईल, अशी आशा बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

सन फार्मा, बजाज फायनान्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली. सध्या एचयूएल, आयटीसी, मारुती, ओएनजीसी, एलअँडटी, एशियन पेंट्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे शेअर तेजीत आहे. 

WebTittle ::  Stock markets fall before the budget is presented

संबंधित बातम्या

Saam TV Live