पंढरपुरात 2 लाख रुपयांचा देशी दारुचा साठा जप्त

Saam Banner Template
Saam Banner Template

पंढरपूर शहर (Pandharpur City) व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरु आहेत. अशा अवैध धंद्याविरोधात पंढरपूर पोलिसांनी व्यापक मोहिम राबवली आहे. मंगळवारी (ता.8)  रात्री येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी रांझणी (ता.पंढरपूर) येथे  केलेल्या कारवाईत तब्बल 2 लाख 1 हजार 600 रुपयांच्या देशीदारुचा अवैधसाठा जप्त केला आहे. यामध्ये 70 बाॅक्समध्ये सुमारे 3 हजार 360 देशी दारुच्या बाटल्यांचा समावेश आहे. लॉकडाऊन काळामध्ये देशी दारू, जुगार,वाळूचोरी,मटक,घरफोडी या सारख्या अवैध धंद्यामुळे शहर व तालुक्यातील कायद्या सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.(Stocks of liquor worth Rs 2 lakh seized in Pandharpur)

अलीकडेच वेळापूर येथे अवैध दारु विक्री करणाऱ्या जमावाने पोलिस अधिकार्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. पंढरपूर शहर व तालुक्यातील अवैध धंद्याची जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गंभीर दखल घेतली असून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळ्याण्यासाठी त्यांनी स्वतः पोलिसांना तशा सचना दिल्या आहेत. त्यानंतर पंढरपूर पोलिस सतर्क झाले आहेत. रांझणी येथील जगदंब हाॅटेलमध्ये  देशी दारुची अवैधपणे विक्री केली जात असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली त्यानंतर त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेवून जगदंब हाॅटेलवर छापा टाकला असता, देशी दारुचा अवैध साठा आढळून आला. अधिक माहिती घेतली असता, हाॅटेलचालकाच्या घरी तब्बल 3 हजार 330 बाटल्यांचा देशी  दारुचा अवैध साठा आढळून आला. 

हे देखील पाहा 

याप्रकरणी प्रदीप बाळासाहेब आवताडे आणि नागेश ढोणे यांना अटक करुन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  केला आहे. दोन दिवसापूर्वी मंगळवेढा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जयश्री पाटील यांनी 63 लाख रुपये किंमतीचा 11 पोती गांजा पंढरपूरहून महूदकडे जात असताना पकडला आहे. पंढरपुरातील  वाढत्या अवैध धंद्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com