साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

ncp karylai
ncp karylai

सातारा :  गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या सातारा Satara शहरातील कोयना दौलत या निवासस्थाना बाहेर अज्ञात दोन व्यक्तींनी गोवऱ्या पेटवल्याची घटना घडली आहे. तसेच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCPकार्यालया वर सुद्धा दगडफेक Stone pelting झाली. काँग्रेसच्या Congress कार्यालाचीही तोडफोड झाली. मराठा आरक्षणाच्या Maratha Arakshan निर्णयाचे हे पडसाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. Stone pelting at NCP office in Satara


काल सर्वोच्च न्यायालयाने Supreme court मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द ठरवले. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीमुळेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. न्यायालयाने राज्य सरकारने बनविलेला मराठा आरक्षण कायदाही सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court of India काल रद्द ठरवला.  

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १२ ते १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते. पण अॅड. जयश्री पाटील यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे काल सुनावणी झाली. त्यात हे आरक्षण रद्द ठरविण्यात आले.

टार्गेट केलंत तर त्याच भाषेत उत्तर देऊ - शशिकांत शिंदे

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर आज दगडफेक करण्यात आली. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "२४ तासांच्या आत आरोपींना अटक करुन माहिती करुन घ्यावी. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही. जर याचिकाकर्ते अॅड. गुणवंत सदावर्ते. आपले असते तर त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली नसती. राष्ट्रवादीची भूमीका मराठा समाजाच्या बाजूची आहे. राजकारण करुन कुणी याचे भांडवल करत असेल तर शासनाने त्याची दखल घ्यावी. जाणीवपूर्वक कुणी एका पक्षाला टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तर देण्याची आमची ताकद आहे. यांचे कर्ते करविते कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा'' 

दुसरीकडे हिंगोलीतही मराठा आरक्षणासाठी  डोंगरकडा येथे तरुणांनी रास्ता रोको केला. आरक्षणाबाबत सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com