औंढा शहरातील पोलीस स्टेशन वर तुफान दगडफेक 'हे' आहे कारण

aundha.
aundha.

हिंगोली - हिंगोलीच्या Hingoli औंढा Aundha पोलीस स्टेशनवर Police Station जमावान तुफान दगडफेक Stone throwing केल्याची घटना घडली आहे.  शंभर ते दीडशे नागरिकांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे Vaijnath Munde यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असताना जमावाने मुंडे यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्या वर प्राणघातक हल्ला केला. Stone throwing at the police station in Aundha town

हे देखील पहा -

या हल्यात वाघमारे हे जखमी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला. या नंतर हिंगोली पोलिसांची मोठी कुमक औंढा शहरात दाखल झाली असून, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर हे देखील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी औंढा पोलीस स्थानकात तळ ठोकून आहेत.

दरम्यान, मोबाईल चोराला पोलीस पकडत नसल्याने दीडशे जणांनी पोलिसांवर हल्ला केला अशी माहित समोर आली आहे. पोलीस अधीक्षक यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com