"लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि घराबाहेर पडु देऊ नका -  उदयनराजे भोसले 

ओंकार कदम
शुक्रवार, 7 मे 2021

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर प्रथमच खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. या बाबत बोलत असताना ते म्हणाले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला, तरी  राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण Maratha reservation रद्द केल्यानंतर प्रथमच खासदार उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. या बाबत बोलत असताना ते म्हणाले आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला, तरी  राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील जेष्ठ लोकांनी आतापर्यन्त आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही असा सवाल उदयनराजेंनीउभा केला आहे. Stop the peoples representatives on the road and dont let them out of the house  

नाव न घेता त्यांनी  शरद पवार Sharad Pawar यांना टोला लगावला आहे. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करू नये असे सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर पडू देऊ नका असे आवाहन मराठा समाजाला उदयनराजेंनी  यावेळी केल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण समाज पेटून उठला आहे. सर्वत्र लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले होते. 

हे देखील पहा -

देवेन्द्र फडणवीस Devendra Fadnavis मुख्यमंत्री असताना उच्च न्यायालयात आरक्षण टिकले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकेल, अशी खात्री सर्वांनाच होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाबतीत योग्य पद्धतीने बाजू मांडली गेली नाही. यासाठी राज्य सरकार कुठेतरी कमी पडले हे निश्चित आहे. Stop the peoples representatives on the road and dont let them out of the house

मराठा समाजावर कायम अन्याय झाला आहे. आता आरक्षण रद्द झाल्याने यापुढेही समाजावर अन्यायच होणार आहे, आणि यासारखे दुर्दैव नाही. मराठा समाजाच्या गरजेपेक्षा, आरक्षणापेक्षा अंतर्गत राजकारणालाच फारसे महत्व दिले गेले आहे. 

इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा धुळे शहर पोलिसांकडून पर्दाफाश...

यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर एकी राहिली नाही. त्याचे गंभीर परिणाम आता भोगावे लागत आहेत. आरक्षणापेक्षा मतांच्या राजकारणाला महत्व दिले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाने केलेल्या कष्टावर, आंदोलनावर अक्षरशः पाणी फिरले आहे. त्यामुळे आता शांत बसायचं नाही तर "लोकप्रतिनिधींना रस्त्यात अडवा आणि घराबाहेर पडु देऊ नका. असा आव्हान उदयनराजेंनी केलं आहे.  

Edited By- Digambar Jadhav 

 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live