कोल्हापुरी प्रेमाची अजब तऱ्हा, रस्त्यावरच केली प्रेमाची कविता

साम टीव्ही
बुधवार, 24 मार्च 2021

लव्ह' कर कोल्हापुरी
कोल्हापुरी प्रेमाची अजब तऱ्हा
रस्त्यावरच केली प्रेमाची कविता
अडीच किलोमीटर रस्त्यावर प्रेमकथा 

तुम्ही अनेक प्रेमवीर पाहिले असतील. पण कोल्हापूरच्या या प्रेमवीराचा नादच खुळाय आपल्या प्रेयसीसाठी त्याने चक्क अडीच किलोमीटर रस्त्यावर प्रेमसंदेश लिहले.

पाडगावकरांची कविता. कवी मंगेश पाडगावकरांची ही कविता असली तरी सगळ्यांचं प्रेम सेम असतं असं नाही.कोल्हापुरातल्या एका प्रेमवीराचं प्रेम थोडं वेगळं आहे. कोल्हापुरातील धरणगुत्ती-जयसिंगपूर मार्गावर एका अज्ञात प्रेमवीरानं त्याच्या प्रेयसीच्या नावानं प्रेमसंदेश लिहलेत. हे प्रेमसंदेश सहज पुसले जाऊ नयेत यासाठी पठ्ठ्यानं ऑईल पेन्टचा वापर केलाय. तब्बल अडीच किलोमीटर रस्त्यावर त्यांनं आपली प्रेमकहाणी लिहून काढलीय. आता या प्रेमवीराची चर्चा होणारच ना आय लव्ह यू चे मॅसेज लिहणारा या प्रेमवीर कोण आहे, आणि त्याची प्रेयसी कोण आहे हे मात्र समजू शकलं नाही. पण पंचक्रोशीत या प्रेमवीराचीच चर्चा आहे.

 प्रेमवीरानं पेन्टिंग ब्रशची लेखणी आणि रस्त्याचा कागद केला. पण त्याचा फायदा झाला की नाही त्याचं त्याला माहिती. बांधकाम विभागाला मात्र त्यानं कामाला लावलं. रस्त्यावरचे प्रेमसंदेश पुसण्यासाठी बांधकाम विभागाचे मजूर दिवसभर राबत होते.
 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live