बायको खर्रा खाते म्हणून चक्क घटस्फोटाची याचिका, वाचा ही आगळी वेगळी बातमी

साम टीव्ही
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021
  • बायको खर्रा खाते म्हणून घटस्फोटाची याचिका
  • घटस्फोटासाठी नवरा चढला कोर्टाची पायरी
  • नवऱ्याचा दावा कोर्टानं फेटाळला

नागपूरमधील शंकर आणि रिना या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि पुष्पा गनेडीवाला यांनी हा निर्णय दिला. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी बाल लैंगिक शोषणाबाबत याआधी दिलेल्या दोन वादग्रस्त निकालांमुळे त्या चर्चेत आल्या.

पान तंबाखू किंवा खर्रा खाणं हे आरोग्यासाठी अपायकारक व्यसन आहे. पण हाच खर्रा नागपुरात संसार तुटण्यासाठी कारणीभूत झालाय. बायको खर्रा खाते म्हणून नागपुरातील एका नवरोबानं घटस्फोटासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका केली होती. बायको खर्रा खाते त्यामुळं तिला आजार झाला या आजारावर मोठा खर्च केला. त्यामुळं खर्रा खाणाऱ्या बायकोपासून घटस्फोट मिळावा असा नवरोबानं अर्ज केला होता. खर्रा खाणं वाईट सवय असली तरी खर्रा खाण्याची सवय काडीमोडासाठी कारण ठरु शकत नाही असा निवाडा कोर्टानं दिलाय.

घटस्फोटांसाठी कोर्टात शेकडो अर्ज येतात. घटस्फोटासाठी एक ना हजार कारणंही सांगितली जातात. पण खर्ऱ्याच्या व्यसनामुळं घटस्फोट मागणाऱ्या नवऱ्याची याचिका जगावेगळी ठरलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live