मेन्यू कार्डमधून ग्राहकांना अजब-गजब सूचना

SAAM TV
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

हॉटेलमध्ये असलेल्या मेन्यू कार्डवर हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ आणि त्यांचे दर अशी माहिती असते. मात्र, पुण्यातील इराणी कॅफेच्या मेन्यू कार्डवर ग्राहकांना चक्क सूचना देण्यात आल्यात...सध्या या मेन्यू कार्डची जोरदार चर्चा आहे

 

हॉटेलमध्ये असलेल्या मेन्यू कार्डवर हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ आणि त्यांचे दर अशी माहिती असते. मात्र, पुण्यातील इराणी कॅफेच्या मेन्यू कार्डवर ग्राहकांना चक्क सूचना देण्यात आल्यात.सध्या या मेन्यू कार्डची जोरदार चर्चा आहे
हे मेन्यू कार्ड काळजी पूर्वक पाहा.

.पुण्यातील बाणेर येथील इराणी कॅफेमधील हे मेनुकार्ड आहे...यामध्ये खाद्य पदार्थांसोबतच ग्राहकांना काही सूचनाही देण्यात आल्यात.....कॅफेत आल्यानंतर ग्राहकांनी काय करावं आणि काय करु नये याची नियमावलीचं मेन्यू कार्डवर छापण्यात आलीय.(grafix in) यामध्ये कॅफेत बसून मोबाईलवर गेम खेळायचे नाही, फूड कुपन्स चालणार नाहीत, कॅशियर बरोबर फ्लर्टिंग करायची नाही इतपासून ते फुकटचे सल्ले न देण्यापर्यंतच्या सूचना कऱण्यात आल्यात.

पुणे शहरात घरं, दुकानांच्या बाहेर लावलेल्या पाट्या आणि त्यावरील मजकूर नेहमीच लक्षवेधी असतो. त्यात आता पुणेरी मेन्यू कार्डची भर पडलीय. हे मेन्यू कार्ड ग्राहकांसाठीही आकर्षणाचं केद्र ठरतंय

सध्या हे मेन्यू कार्ड सोशल मीडियावर तुफान व्हायरलं होतोय. पुणं तिथं काय उणं या उक्तीला साजेसचं हे मेन्यू कार्ड आहे

 


संबंधित बातम्या

Saam TV Live