harshwardhan
harshwardhan

आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचे अजब वक्तव्य !

नवी दिल्ली: 'मागील वर्षीच्या तुलनेत कोरोनाच्या बाबतीत आपण यंदा मजबूत स्थितीत आहोत. कारण  सुरुवातीला आपली लढाई शून्यापासून सुरू झाली होती. त्यावेळी या व्हायरसच्या बाबतीत कोणाला काहीही माहिती नव्हती. मात्र आताच्या घडीला आपली स्थिती पूर्वीपेक्षा चांगली झालेली आहे. आणि त्यामुळे आपण मानसिक दृष्ट्या कोरोनाशी लढण्यासाठी तयार आहोत'. असे अजब वक्तव्य आरोग्य मंत्री हर्ष वर्धन Harshvardhan यांनी केले आहे. आणि त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरातून सडकून टीका केली जात आहे. Strange statement of Health Minister Dr Harsh Vardhan on Corona wave

वेबिनार मध्ये संबोधित करताना डॉ. हर्ष वर्धन यांनी साथीच्या आजारामुळे रक्त आवश्यकतेची पूर्तता करण्यासाठी अधिक सामर्थ्याने आणि विस्तारासह रक्तदान Blood Donation शिबिरे आयोजित करण्याच्या फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले. 'माणुसकीसाठी मोठी मदत आहे म्हणून वाढदिवशी वर्षातून एकदा तरी रक्तदान करावे' अशी विनंती आणि आवाहन त्यांनी प्रत्येक व्यक्तीस केले आहे. ते म्हणाले कि त्यांच्या मते, 'मंदिरात भेट देण्यापेक्षा रक्तदान करणे अधिक धार्मिक आहे.  

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी जानेवारीत जगातील सर्वात मोठी लसीकरण Vaccination मोहीम सुरू केली असून आता १ मेपासून तरुणांना लसीकरण सुरू होणार आहे. आणि या पुढे जाऊन लसीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे.

Edited by- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com