अवैध दारू विक्रीची अजब शक्कल; जमिनीत पुरून ठेवली दारू

जयेश गावंडे
सोमवार, 10 मे 2021

लॉकडाऊनच्या काळात अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी दोन व्यक्तींनी अजब शक्कल लढवून सुमारे साडेआठशे देशी दारूच्या बाटल्या जमिनीत गाढुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील अकोट फैल पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे.

अकोला : लॉकडाऊनच्या Lockdown काळात अवैधरित्या देशी दारू विक्रीसाठी दोन व्यक्तींनी अजब शक्कल लढवून सुमारे साडेआठशे देशी दारूच्या बाटल्या जमिनीत गाढुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील Akola अकोट फैल पोलिसांनी Police या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे. हा प्रकार आगर रोडवरील एका शेतामध्ये उघडकीस आला आहे. जवळपास १ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी गौतम शिरसाट आणि विश्वराज भातकुले यास अटक केली आहे. The strange technique of illegal liquor sales; Alcohol buried in the ground

हा प्रकार पाहून पोलिस ही चक्रावले आहेत.  विशेष म्हणजे, हे देशी दारूचे बॉक्स शेतात दूरदूर जमिनीत गाढण्यात आले होते.  उगवा येथील आगर रोडवरील शेतामध्ये गौतम शिरसाट व विश्र्वराज भातकूले यांनी शेतातील झोपडीजवळ देशी दारूचे बॉक्स लपवून ठेवले होते. 

हे देखील पहा -

पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला होता. त्याआधारे शेतातील झोपडीजवळ जाऊन अकोट फैल पोलिसांनी पाहणी केली असता दोघे शेतातील मातीमध्ये देशी दारुचे बॉक्स लपवून त्यावर माती टाकताना दिसले. त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. The strange technique of illegal liquor sales; Alcohol buried in the ground

गौतम नारायण शिरसाट व विश्र्वराज सुरेंद्र भातकूले यांच्याजवळून 180 मि.ली.चे 300 नग देशी दारू किंमत 16 हजार 500 रुपये जप्त केली. 90 मि.ली.चे 550 देशी दारूचे नग किंमत 17 हजार 400 रुपये यासह दुचाकी 55 हजार रुपये आणि 12 हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण एक लाख 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनगीर पोलीसांकडून बनावट दारू तयार करणारा कारखाना उद्धवस्त

जमिनीत देशीदारूचे क्वाटर गाढुन ठेवल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणल्यानंतर पोलिस ही चक्रावून गेले. चोरीची ही पध्दत नवीन असल्याने पोलिसांनी या दोघांना चांगलाच प्रसाद दिला. त्यांनी याआधी किती माल विकला, केव्हापासून विकत आहेत, याची माहिती ही घेतली. The strange technique of illegal liquor sales; Alcohol buried in the ground

Edited By - Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live