साताऱ्यात अजब प्रशासनाचा गजब कारभार; जिवंत व्यक्तीला ठरवलं मृत

boy form satara
boy form satara

सातारा - कोरोनाच्या Corona काळात सातारा Satara जिल्ह्यातील प्रशासनाचा गोंधळलेला कारभार आज पर्यंत वारंवार समोर आला आहे.आता तर एक भलतीच घटना समोर आली आहे. कोरोनातून बरा होऊन घरी गेलेल्या मुलालाच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचा उपजिल्हा रुग्णालय फलटण मधून फोन आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. Strange thing happened in Satara 

सिद्धांत भोसले या फलटण मधील तरुणाला मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याने खाजगी रुग्णालयातून उपचार घेतले तो बरा झाला आणि घरी देखील गेला.असं असताना सातारा जिल्हा परिषदेकडून उपजिल्हा रुग्णालय फलटण यांना मृत लोकांची यादी पाठविण्यात आली.

या यादीत चक्क सिद्धांत भोसलेला मृत घोषित करण्यात आले आहे. ही यादी मिळाल्या नंतर उपजिल्हा रुग्णालय फलटण मधील महिला कर्मचारी यांनी यादीतील सिद्धांत भोसले यांच्या मोबाईल वर फोन केला.पहिल्यांदा सिद्धांत ने हा प्रकार ऐकल्यावर तो गोंधळला पण नंतर त्याने आलेल्या फोन वर नर्सला चांगलंच फैलावर घेतले. Strange thing happened in Satara 

हे देखील पहा -

सातारा जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा जिल्हा प्रशासन यांच्या गोंधळलेल्या कामाच्या पद्धती वेळोवेळी समोर आल्या आहेत. एवढेच काय तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांना साताऱ्यातील दुसऱ्या लाटे बाबत नियंत्रण मिळवण्यासाठी साताऱ्यात येऊन कान उपटावे लागले. जिल्हावासीयांना अस वाटलं की त्या नंतर तरी प्रशासन सुधारेल पण फलटण मधील या प्रकारा नंतर प्रशासनाचा गजब कारभार परत समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com