रेल्वे स्थानकात कुत्र्यांची लसीकरण मोहीम....

Stray Dogs Steralisation at Railway Stations
Stray Dogs Steralisation at Railway Stations

डोंबिवली : शहरात भटक्‍या कुत्र्यांची Stray Dogs संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो.म्हणूनच "पॉज' संस्थेतर्फे दरवर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज Rabies Vaccination लसीकरण मोहीम घेतली जाते.त्याचप्रमाणे यावर्षीही "पॉज' संस्थेने रेबीज लसीकरण मोहीमेला सुरवात केली आहे. Stray Dogs Sterilization at Dombivali Railway Station

ठाणे Thane जिल्ह्यात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना 'अँटी रेबीज लस' देण्याचा उपक्रम "पॉज'ने मागील वीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते.

हे देखिल पहा - 

मात्र भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीज विरोधी मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.बुधवारी 5 मे रोजी कोपर रेल्वे स्थानक, डोंबिवली रेल्वे स्थानक आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानक मधील सुमारे ३५ भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचण्यात आली. Stray Dogs Sterilization at Dombivali Railway Station

पुढील टप्प्यामध्ये कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे येथे ही मोहीम राबवण्यात येईल असे राज मारू यांनी सांगितले.यावेळी पॉज संस्थेचे तीन स्वयंसेवक आणि एक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबवल्याचे संस्थेचे निलेश भणगे यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com