बारामतीत आज मध्यरात्री पासून कडक लॉकडाउन

मंगेश कचरे
मंगळवार, 4 मे 2021

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात ७ दिवसांचा कडक लॉक डाऊन करण्यात आले आहे. हा लॉक डाउन आज मध्यरात्री पासून लागू करण्यात येणार आहे 

बारामती : वाढत्या कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात ७ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. हा लॉकडाउन Lockdown आज मध्यरात्री पासून लागू करण्यात येणार आहे. Strict lock down in Baramati from midnight today 

गेल्या काही दिवसापासून बारामती Baramati तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुकारलेल्या वीकेंड लॉकडाउनला  बारामतीत १०० टक्के प्रतिसाद मिळाला होता.

 हे देखील पहा -

या काळात फक्त मेडिकल Medical आणि हॉस्पिटल सुरू राहतील. दूध विक्री सकाळी ७ ते ९ यावेळीत सुरू राहील. भाजी मंडई आणि इतर सर्व आस्थापना बंद राहतील. त्यामुळे भाजी मंडईत बारामतीकारांची मोठी गर्दी झाली आहे. Strict lock down in Baramati from midnight today 

अमरावतीत महसूल विभागाच्या रक्तदान अभियानाला भरभरून प्रतिसाद

बारामतीत प्रत्येक चौकात मोठा पोलीस Police बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. इतकंच नाही, तर बारामतीत विनाकारण मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींची ॲंटीजेन Antigen तपासणी करण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.

Edited By- Digambar jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live