Breaking नगरमध्ये उद्या मध्यरात्रीपासून कडक लाॅकडाऊन

सचिन आगरवाल
शनिवार, 1 मे 2021

नगर शहरामध्ये कोरोना चा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी नगर प्रशासनाच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे.

नगर :  नगर Ahmednagar शहरामध्ये कोरोनाचा Corona प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी नगर प्रशासनाच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन Lock Down जाहीर केला आहे. Strict Lock Down in Nagar from Tomorrow Midnight

उद्या रात्री बारा वाजल्यापासून ते १० मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये आरोग्य सुविधा सोडून फक्त दूध Milk सकाळी ७ ते ११ पर्यत विक्री चालू  राहणार आहे.  तसेच किराणा विक्री व भाजीपाला विक्री , फळ विक्री बंद राहणार आहे तरी कृपा करून शेतकऱ्यांनी Farmers नगर शहरामध्ये आपला शेतीमाल विक्रीस आणू नये, अन्यथा मनपाच्या वतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शंकर गोरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

बारामतीतल सापडले ३९४ रुग्ण
बारामती Baramati शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत नसल्याने आता सर्वांचीच झोप उडाली आहे.  बारामतीत  तब्बल ३९४  जण पॉझिटीव्ह सापडल्याने आज पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. बारामतीतील रुग्णांच्या संख्येत आज घट झाली आहे आतापर्यंत बारामतीत १७८६४रुग्ण आढलेत. यापैकी ३६१ जणांचा मृत्यू तर १३४११ रुग्ण बरे झाले आहेत. Strict Lock Down in Nagar from Tomorrow Midnight

सिंधूदुर्गात चेकनाक्यावर चाकरमान्यांची गर्दी
तळकोकणाचे Konka प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण चेक नाक्यावर चाकरमान्यांची तुफान गर्दी होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सिंधुदुर्ग Sindhudurg जिल्ह्यात दर दिवशी हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होत आहेत. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ५९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आज आणखी ५४३ जनांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live