नाशिककरांना २३ मेपर्यंत घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 11 मे 2021

शहरासह जिल्ह्यात येत्या  उद्या बुधवार (ता.१२)पासून अकरा दिवसांचा कडकडीत लॉकडाउन केला जाणार आहे. रविवार (ता. २३) मध्यरात्री बारापर्यंत शहर-जिल्ह्यात लॉकडाउन होणार आहे.

नाशिक : शहरासह Nashik जिल्ह्यात येत्या  उद्या बुधवार (ता.१२)पासून अकरा दिवसांचा कडकडीत लॉकडाउन Lock Down केला जाणार आहे. रविवार (ता. २३) मध्यरात्री बारापर्यंत शहर-जिल्ह्यात लॉकडाउन होणार आहे. वैद्यकीय Medical किंवा अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी असणार आहे. Strict Lock Down in Nashik From Wednesday

‘ब्रेक द चेन’ Break The Chain मोहिमेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध कडक केले असतानाही शहर-जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे पुढे आले आहे. रोज तीन ते साडेतीन हजारांच्या आसपास कोरोनाची रुग्णसंख्या स्थिर राहत असल्याने जिल्हा प्रशासनाने अखेर कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे Suraj Mandhare यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होऊन त्यात शहर- जिल्ह्यात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता.८) पालकमंत्री छगन भुजबळ Chagan Bhujbal यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेऊन कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा घेतला होता. Strict Lock Down in Nashik From Wednesday

त्यानंतर सोमवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन जिल्हा प्रशासनाने नाशिक शहर आणि जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दुपारी निर्बंधाचे आदेश काढले.

येत्या बुधवारी (ता. १२) दुपारी बारापासून कडक लॉकडाउन सुरू होईल. यामध्ये केवळ रुग्णालय, मेडिकल दुकानेच सुरू राहणार असून, पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी इंधन पुरवठा होणार आहे. नाशित शहर तसेच पूर्ण जिल्ह्यात लॉकडाउनचा निर्णय राबविला जाणार आहे. त्यामुळे पुढील अकरा दिवसांत विनापास फिरता येणार नाही. पेट्रोलपंपावर अत्यावश्यक वाहनांना इंधन पुरवठा होईल. तसेच औद्योगिक वसाहतीत अधिक कडक निर्बंध लावून कामकाज चालेल. भाजीबाजार अत्यावश्यक सेवेत येत असला तरी, त्यातून सुपर स्प्रेडर वाढत असल्याने बाजार समित्या बंद ठेवून भाजीबाजारावर नियंत्रण येईल.Strict Lock Down in Nashik From Wednesday

लॉकडाउनची नियमावली
- शहर-जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या राहणार बंद
- वैद्यकीय-अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णतः बंदी
- सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत घरपोच पार्सलद्वारेच अत्यावश्यक सेवा
- सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत बँका, पतसंस्था, टपाल कार्यालय सुरू
- सकाळी सात ते बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत हॉटेल, मद्यविक्री
- सकाळी सात ते दुपारी बारा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दूध संकलन व विक्री
- शेतीमाल विक्रीसाठी समित्या करणार पर्यायी विकेंद्रित पद्धत
- बाजार बंद ठेवून सकाळी सात ते बारा या वेळेत रस्त्यालगत भाजीविक्री
- औषधनिर्मिती, ऑक्सिजन वगळता इतर उद्योग ‘इन हाउस’ पद्धतीने
- कृषी अवजारे, कृषी निविष्ठा सकाळी सात ते बारा या वेळेतच होणार
- क्रीडांगण, उद्यान, बगीचे, मोकळी मैदान, शाळा, कॉलेज पूर्णपणे बंद
- नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात पाच व्यक्तीत विवाह
- अंत्यविधीला २०, तर इतर उत्तरकार्यविधीसाठी १५ व्यक्तींना परवानगी
- करमणूक साधणे, व्यायामशाळा, तरण तलाव, सभागृह पूर्णपणे बंद
- रुग्णालय आणि मेडिकल दुकाने २४ तास सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांना इंधन पुरविणार
- घरपोच गॅस सिलिंडर विक्री सुरू, शासकीय कार्यालय सामान्यांसाठी बंद
- अत्यावश्यक सेवेसाठीच रिक्षा, टॅक्सीसह सार्वजनिक वाहतूक सेवा

Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live