बुलढाणा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू

संजय जाधव
मंगळवार, 11 मे 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 10 मे पासून ते 20 मे पर्यंत 10 दिवसाच्या लॉकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे

बुलढाणा : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बुलढाणा Buldhana जिल्ह्यात दिनांक 10 मे पासून ते 20 मे पर्यंत 10 दिवसाच्या लॉकडाऊनचा Lockdown निर्णय जिल्हा प्रशासनाने Administration घेतला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.Strict Lockdown continues in Buldhana District

नाना भाऊ आम्ही काय करावं...जगावं की मरावं!

बुलढाणा शहरात लॉकडाऊनचे नियम पाळत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरातील रस्ते आता निर्मनुष्य दिसून येत आहेत. तसेच सर्वत्र शुकशुकाट आहे.  कालपासुन रस्त्यावर बॅरेगेट्स लावण्यात आले असून एका भागातून दुसऱ्या भागात कोणालाही जाता येणार नाही अशी व्यवस्था याठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी पोलीस Police प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

 हे देखील पहा -

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कडक उपाययोजना करण्यात येत असून रुग्णसंख्येचा वाढत असणारा आलेख नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. याच अनुषंगाने जिल्हयात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. Strict Lockdown continues in Buldhana District

Edited By : Krushna Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live