कोरोना ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांसंबंधी कठोर आदेश, कोरोना जाईपर्यंत शिक्षकांना ड्युटी करावीच लागणार! नाहीतर...

साम टीव्ही
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

 

  • कोरोना ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांसंबंधी कठोर आदेश
  • 'कोरोना ड्युटी नकोय तर बिनपगारी रजा घेऊन घरी बसा'
  • कोरोना जाईपर्यंत शिक्षकांना ड्युटी करावीच लागणार

कोरोना ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांबद्दल सरकारनं कठोर धोरण स्वीकारायचं ठरवलंय. कोरोना ड्युटी नकोय तर बिनपगारी रजा घेऊन घरी बसा, असा आदेशच सरकार काढणार आहे.

कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत शिक्षकांची मदत घेतली जातेय. मात्र आरोग्याचा प्रश्न, कौटुंबिक अडचणी पुढे करुन अनेक शिक्षक ड्युटी नाकारतायंत. अशा कोरोना ड्युटी नाकारणाऱ्या शिक्षकांसाठी शासनानं कठोर धोरण स्वीकारायचं ठरवलंय.

शिक्षकांसाठी कठोर आदेश

  • कोरोना हद्दपार होईपर्यंत शिक्षकांना टप्प्याटप्प्यानं 30 दिवसांची ड्युटी करावीच लागणार आहे. 
  • कोरोना ड्युटी नको असेल तर बिनपगारी रजा घेऊन घरी बसा असं धोरण सरकार स्वीकारायच्या तयारीत आहे.
  • मार्च महिन्यापासून आरोग्यसेवक कोरोनाशी झुंज देतायंत. त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्यात येतेय. विशेष करुन सर्वेक्षणाचं काम शिक्षकांना देण्यात येतंय. मात्र काही शिक्षकांकडून कोरोनासंबंधी काम नाकारण्यात येतंय. त्यामुळेच शासनावर कठोर आदेश काढायची वेळ आलीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live