Big Breaking राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून १५ दिवस पूर्ण संचारबंदी

Lock Down Return
Lock Down Return

मुंबई : राज्यातली कोरोनाची Corona स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून ही दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात उद्या (ता.१४)  रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रीलपर्यंत कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज येथे केली. मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना ही घोषणा केली. त्यानुसार ३० एप्रीलपर्यंत राज्यात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. Strict Restriction in Maharashtra From Tomorrow Announces Uddhav Thackeray

राज्यात Maharashtra रुग्णसंख्या वाढते आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. रुग्णालयांत खाटा शिल्लक नाहीत. रेमडिसेव्हिर या औषधाचा प्रचंड तुटवडा आहे. लसीकरणाच्या आकड्यांवरुन राज्य व केंद्र सरकार यांच्यात मतभिन्नता आहे. अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर्स उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन लावण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हा लाॅकडाऊन लावण्याअगोदर मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. सरकार जर हातावर पोट असणाऱ्यांची काळजी घेणार असेल तर आम्ही सरकारला सहकार्य करु अशी भूमीका विरोधी पक्षांनी घेतली होती. सुरुवातीला सत्ताधारी महाविकास आघाडीतूनही काही प्रमाणात लाॅकडाऊनला विरोध होता. मात्र, नंतर हा विरोध मावळला. व्यापारी संघटनांनीही लाॅकडाऊनला विरोध केला होता. पण पुण्यासारख्या शहरात व्यापाऱ्यांच्या संघटनेनेही नरमाईची भूमीका घेतली. Strict Restriction in Maharashtra From Tomorrow Announces Uddhav Thackeray

मुख्यमंत्र्यांनी कोरोना टास्क फोर्सच्या Task Force सदस्यांशीही सलग दोन दिवस चर्चा केली. त्यात राज्यात कोरोनाची साखळी तोडायची असेल तर पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही, असे या टास्क फोर्सच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. मात्र, लाॅकडाऊन Lock Down आठ दिवसांचा असावा की पंधरा दिवसांचा यावर टास्क फोर्समध्येच दोन मतप्रवाह होते. अखेर        दिवसांचा लाॅकडाऊन लावण्यात आला. राज्यात लाॅकडाऊन लावावा लागेल, मात्र त्याबाबत अंतीम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे गेले काही दिवस वारंवार सांगत होते. 

अशी असेल नवी नियमावली
- काही निर्बंध लाॅकडाऊन सदृश्य आहेत
- निर्बंध उद्या ८ पासून लागू होतील
- पंढरपूर- मंगळवेढा मतदान होईपर्यंत अपवाद राहणार
- उद्या सायंकाळपासून ब्रेक द चेन तोडण्यासाठी १४४ कलम लागू करत आहोत
- राज्यात संचारबंदी लागू
- पंधरा दिवस संचारबंदी लागू
- सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
- अन्य सर्व आस्थापना बंद राहणार
- सार्वजनिक वाहतूक केवळ अति आवश्यक कामांसाठी वापरता येणार
- कुणालाही कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही
- बँका सुरु राहणार
- ई-काॅमर्स योजना सुरु राहणार
- पेट्रोल पंप सुरु राहणार
- हाॅटेल, रेस्टाॅरंट बंद राहणार
- कष्टकऱ्यांना एक महिना तीन किलो गहू व तिन किलो तांदूळ मोफत देणार
- पुढचे एक महिना शिवभोजन मोफत देणार

Strict Restriction in Maharashtra From Tomorrow Announces Uddhav Thackeray

काय म्हणाले मुख्यमंत्री.........
गेला गुढीपाडवा Gudhi Padwa ते आजचा गुढी पाडवा यात खूप फरक आहे. पुन्हा युद्धाला सुरुवात झाली आहे. आजचा सर्वात उच्चांक गाठणारा आकडा आहे. ६०२१२ रुग्ण आज नोंदले गेले आहेत. आत ५२३ चाचणी केंद्र आहेत. गेल्या वर्षी सुरुवातील दोनच होती. आता वाढवलेल्या सुविधाही अपुऱ्या पडत आहेत. चाचणी केंद्रावर प्रचंड बोजा आहे. कोरोना चाचण्यांचा भार वाढल्याने निकाल यायला वेळ लागतो. 

दहावी बारावीच्या परिक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. आपली परिक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. आज चहूबाजूंनी दडपण येते आहे. मी गेले काही दिवस समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मतमतांतरे असणारच. पण किती काळ चर्चा करायची? हे आता परवडणारे नाही. Strict Restriction in Maharashtra From Tomorrow Announces Uddhav Thackeray

रेमडिसिव्हीरचा पुरवठा हळूहळू सुरु होतो आहे. त्याची मागणी प्रचंड वाढली आहे. १२०० मेट्रीक टन आॅक्सिजनचा वापर केवळ वैद्यकीय कारणांसाठी करतो आहोत. अधिकचा आॅक्सिजन लागणार आहे. अन्य राज्यांतून आॅक्सिजन आणण्याची परवानगी द्या, असे मी पंतप्रधानांना सांगितले आहे. आॅक्सिजन रस्त्याने आणण्याऐवजी हवाई मार्गाने आॅक्सिजन आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. हवाई दलाला मदत करण्याचे आदेश देण्याची विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. आज आरोग्य व्यवस्था तोकडी पडताना दिसते आहे. पण आपण स्वस्थ बसलेलो नाही. 

ही रुग्णवाढ भयावह आहे. आपण येत्या काळात आरोग्य सुविधा वाढवतो आहोत. जे जे करता येईल ते करतो आहोत. लस देत असलो तरी परिणाम यायला वेळ जायला लागतो. ही आरोग्य सुविधा वाढवल्यानंतर आपल्याला डाॅक्टर लागणार आहेत. त्यासाठीही आपण प्रयत्न करतो आहोत. निवृत्त झालेल्या परिचारीका, कर्मचारी यांनी पुन्हा एकदा मदतीला, कोरोनाशी लढायला पुढे यावे. सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे की उणीदुणी काढण्याची ही वेळ नाही. नाहीतर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. आता राजकारण बाजूला ठेवा. हे मोठे संकट आहे. जर याला साथ म्हणत असू तर आपण एकसाथ लढायला हवे.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com