सातारा जिल्हयात आज पासुन कडक ७ दिवसाचा लाॅकडाउन...

ओंकार कदम
मंगळवार, 4 मे 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन कठोर पावले टाकत आहेत. आता सातारा जिल्ह्यातही सकाळी ७ वाजल्यापासून पुढचे ७ दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सातारा : कोरोनाचा Corona वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर प्रशासन Administration कठोर पावले टाकत आहेत. आता सातारा Satara जिल्ह्यातही सकाळी ७ वाजल्यापासून पुढचे ७ दिवस कडक लॉकडाऊन Lockdown लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी 'ब्रेक द चेन' अंतर्गत याबाबतचा आदेश जारी केला आहे. Strict Seven day lockdown in Satara district from today 

हे देखिल पहा

जिल्हयात काल संध्याकाळ पासूनच ७ दिवसांचा कडक लॉक डाऊन लावत असल्याची घोषणा पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी केली होती. त्यामुळेच आज जिल्ह्यात कडक लाॅकडाउनला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासुनच शहरातील पोवई नाका, राजवाडा परिसर तसेच समर्थ मंदिर परिसरात पोलिसांकडुन Police कारवाईला सुरुवात झाली आहे.

रेमडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांनो सावधान

मात्र, सातारा शहरात अजुनही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सकाळ पासूनच सातारा पोलीस ऍक्शन मोडवर दिसले आहेत. सकाळ पासूनच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी बेधडक कारवाई Action चा बडगा उचलला आहे.

Edited By- Digambar jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live