पोलिस भरतीच्या नव्या निकषांविरुध्द विद्यार्थ्यांचे आंदोलन

पोलिस भरतीच्या नव्या निकषांविरुध्द विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुणे : पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलिस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुण्यात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर 10 विद्यार्थी पुण्याहून मुंबईला मागण्यांचे निवेदन घेऊन धावत जाणार आहे. पुण्यात 11 फेब्रुवारी पर्यंत 50 विद्यार्थी धरणे आंदोलन करणार आहे. 

पूर्वी पोलिस भरती प्रक्रिया 200 गुणांची घेतली जात होती. त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी 100 गुणांची आणि लेखी परीक्षा 100 गुणांची असे. नव्या निकषानुसार पोलिस भरती प्रक्रिया 150 गुणांची करण्यात आली असून त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीचे 50 गुण कमी करण्यात आलेले आहेत आणि 50 गुणांची शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

गेली अनेक वर्ष शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होणार आहे.या बदललेल्या निकषानुसार लेखी परीक्षेला शारीरिक क्षमता चाचणी पेक्षा जास्त महत्व दिले. हा बदल अचानकपणे परीक्षेच्या तोंडावर झाल्यामुळे राज्यातील सर्व मुला-मुलींमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार झालेले आहे पूर्वीप्रमाणे भरती प्रकिया असावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 
 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Web Title: Students agitation against the changes in the recruitment process in police

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com