१० जून पासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे - अमित देशमुख 

amit
amit

मुंबई :  सध्या कोवीड१९ प्रादुर्भावाची परिस्थिती आहे, हे जरी खरे असले तरी या कारणास्तव वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा Exam रद्द करणे किंवा ऑनलाइन Onilne घेणे नियमाला अनुसरून नाही आणि न्यायालयानेही त्यास परवानगी दिलेली नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी Parents ही बाब समजून घेऊन परीक्षेला सामोरे जाण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित  विलासराव देशमुख Amit Deshmukh यांनी केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संपूर्णता काळजी घेतली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.  Students should focus on their studies for the exams starting from June 10 

या संदर्भाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, राज्यात कोवीड१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १ जून पर्यंत लॉकडाऊन लागू आहे, त्यामुळे २ जून पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या १० जून पासून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

कोवीड१९ प्रादुर्भावात वाढ न झाल्यास त्या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचे नियोजन आरोग्य विद्यापीठ व वैद्यकीय महाविद्यालयानी केले आहे, असे असतांना या परीक्षा रदद कराव्यात, त्या पूढे ढकलाव्यात किंवा त्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात अशी मागणी काही विदयार्थी करीत आहेत. वास्तवीक पाहता वैदयकीय महाविदयालयाकडून शिक्षण घेणारे विदयार्थी भविष्यात डॉक्टर होवुन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणार आहेत.

अशा अत्यंत महत्वाच्या क्षेत्रात भविष्यात काम करण्याची जबाबदारी घेणाऱ्या विदयार्थ्याच्या परीक्षा रदद करणे किंवा ऑनलाईन घेणे संयुक्तीक ठरत नाही. केद्रिंय नियामक मंडळालाही ते मानय नाही शिवाय उच्चन्यायालयानेही ही बाब नाकारली आहे. त्यामुळे परीक्षा घेणे अनिवार्य ठरते आहे. एकंदरीत या पार्श्वभुमीवर सर्व विदर्यार्थ्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करून परीक्षेला सामोरे जाणे हिताचे ठरणार आहे. वैदयकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक यांनीही या संदर्भाने विदयार्थी तसेच त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे परीक्षेसाठी त्यांना प्रेरीत करावे असे आवाहन  देशमुख यांनी केले आहे.  Students should focus on their studies for the exams starting from June 10 

मागच्या वर्षातील कोरोनाचे संकट असतांना महाराष्ट्र आरोग्य विदयापीठाने परीक्षा यशस्वीरीत्या घेतली असून त्या सुरक्षीत वातावरणात पार पडल्या आहेत. पुढच्या महिन्यात १० जून पासून वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी विदयार्थ्यांना संपुर्णता कोवीड१९ सुरक्षा कवच पुरवीले जाणार असून त्यांच्या आरोग्याची सर्वेातोपरी काळजी घेतली जाणार आहे, त्यामुळे विदयार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी असे आवाहन शेवटी या निवेदनात त्यांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com