Breaking -CBI च्या संचालकपदी सुबोध जयस्वाल

 Subodh Kumar Jaiswal
Subodh Kumar Jaiswal

नवी दिल्ली :  केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या CBI प्रमुख पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं तीन जणांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल Subodh Jaiswal यांचेही नांव आघाडीवर होते. आता रात्री उशीरा जयस्वाल यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. Subodh Jaiswal Appointed as Director of CBI 

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे Supreme Court मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा, विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांची सीबीआयचे संचालक नेमण्याबाबत बैठक झाली. १९८४, ८५, ८६ व ८७ बॅचच्या सुमारे शंभर अधिकाऱ्यांची नावे विचाराधीन होती. त्यात सुबोध जयस्वाल, के. आर. चंद्रा व व्हीकेएस कौमुदी ही तीन नावे निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  यापैकी जयस्वाल यांच्या नांवावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

जयस्वाल यांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी काम केलं आहे. देशात गाजलेल्या बनावट मुद्रांक प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे जयस्वाल प्रमुख होते. त्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी अटक केली होती.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोला (सीबीआय) मंगळवारी रात्री उशिरा आपला नवीन बॉस मिळाला. आयपीएस सुबोध कुमार जयस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयस्वाल हे  1985 च्या तुकडीतील भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत आणि यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील पोलिस महासंचालक पदाची धुरा सांभाळली आहे. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक आहेत. त्यांचा  कार्यकाळ २   वर्षांचा  असेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com