सीबीआय प्रमुखपदाच्या शर्यतीत सुबोध जयस्वालांचे नांव

साम टिव्ही ब्युरो
मंगळवार, 25 मे 2021

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं तीन जणांच्या नावांची शिफारस केली आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांचेही नांव आघाडीवर आहे

नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या CBI प्रमुख पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं तीन जणांच्या नावांची शिफारस केली आहे. त्यात महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल Subodh Jaiswal यांचेही नांव आघाडीवर आहे. Subodh Jaiswal name figures in CBI Directors Post list

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे Supreme Court मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमणा, विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांची सीबीआयचे संचालक नेमण्याबाबत बैठक झाली. १९८४, ८५, ८६ व ८७ बॅचच्या सुमारे शंभर अधिकाऱ्यांची नावे विचाराधीन होती. त्यात सुबोध जयस्वाल, के. आर. चंद्रा व व्हीकेएस कौमुदी ही तीन नावे निवडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आज या पैकी एका अधिकाऱ्याचे नांव जाहीर होण्याची शक्यता आहे.  

हे देखिल पहा

जयस्वाल यांनी महाराष्ट्रात औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी काम केलं आहे. देशात गाजलेल्या बनावट मुद्रांक प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे जयस्वाल प्रमुख होते. त्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी अटक केली होती. Subodh Jaiswal name figures in CBI Directors Post list

विमानात लग्न करणं पडलं महागात

राज्य सरकारशी छुपा वाद झाल्याने तीन अतिवरिष्ठ पोलिस अधिकारी या वर्षाच्या सुरुवातीत प्रतिनियुक्ती तथा डेप्यूटेशनवर केंद्रात गेले होते.  सुबोधकुमार जयस्वाल रश्मी शुक्ला आणि डीआयजी मनोजकुमार शर्मा यांचा समावेश होता. बदल्यांवरून खटके उडाल्याने प्रथम डीजीपी जयस्वाल हे नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात ७ जानेवारीला केंद्रात डेप्यूटेशनवर गेले. तर, त्यानंतर महिनाभराने ८ फेब्रुवारीला शुक्लांनीही त्यांचे अनुकरण केले होते.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live