VIDEO | आता ऑफिसला उडत जा, जपानमध्ये उडत्या कारची चाचणी यशस्वी

साम टीव्ही
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

 

  • आता ऑफिसला उडत जा
  • ट्रॅफिक आहे ? आता नो टेन्शन
  • जपानमध्ये उडत्या कारची चाचणी यशस्वी

उडत्या कारमधून प्रवास करण्याचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण जपानमध्ये उडत्या कारची चाचणी यशस्वी झालीय.

आता कितीही वाहतूक कोंडी असली तरी नो टेन्शन. ऑफिसला तुम्ही अक्षरश: उडत जाऊ शकता. आकाशात उडणाऱ्या कारचं परीक्षण जपानमध्ये यशस्वी झालंय. जपानच्या स्काईड्राईव्ह इंकनं उडत्या कारचं परीक्षण केलंय.

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता एका मोटारसायकल किंवा मोठ्या ड्रोनच्या आकाराच्या वाहनावर चाचणी करण्यात येतेय. जमिनीपासून काही फुटांवर हे वाहन उडताना दिसतंय. साधारण चार मिनिटांपर्यंत हे वाहन हवेत आरामात उडताना यशस्वी झालंय.

  • अशी असेल उडती कार
  • सुरुवातीच्या टप्प्यात एकच व्यक्ती बसू शकेल
  • आता १० मिनिटंच ही हवेत उडू शकते
  • पण ३० मिनिटं हवेत कशी उडू शकेल यावर संशोधन सुरु
  • 60 किलोमीटर प्रतितास असा या उडत्या कारचा वेग असेल
  • उडत्या कारची सुरक्षा हे सर्वात मोठं आव्हान असेल

2023 पर्यंत उडणारी कार वास्तवात आणण्याचा स्कायड्राईव्ह कंपनीचा प्रयत्न आहे. कारची सुरक्षा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय. 

वाहतूक कोंडीचा प्रश्न साऱ्या जगात आहे. पण आता उडत्या कार्समुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न विसरा. कोरोनाच्या परिस्थितीत ही बातमी सर्वांसाठी आनंदाची ठरेल यात काही शंका नाही.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live