लॉकडाऊनचा असाही साईट इफेक्ट, भारतात डिंसेबरपर्यंत 2 कोटी मुलं जन्माला येणार

साम टीव्ही
सोमवार, 11 मे 2020
  • जगभरात जन्मदर वाढण्याचा UNचा इशारा
  • भारतात डिंसेबरपर्यंत 2 कोटी मुलं जन्माला येणार
  • लॉकडाऊनचा असाही साईट इफेक्ट

लॉकडाऊनमुळे बेरोजगारी आणि आर्थिक मंदी यांसारखे अनेक विपरीत परिणाम जगावर झालेत. मात्र याहूनही एका मोठ्या साईड इफेक्टचा इशारा, संयुक्त राष्ट्रानं दिलाय. काय आहे हा इशारा? पाहा

घरात राहा,कोरोना टाळा. कोरोना संकटावर मात करण्यासाठी हाच काय तो एकमेव पर्याय. त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसून आले. मात्र नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच लॉकडाऊनलाही आहेत. लॉकडाऊनचे अनेक साईड इफेक्टही आहे
यापैकीच एक आहे तो म्हणजे जन्मदर वाढीचा. यूएन अर्थात संयुक्त राष्ट्रानं तसा इशाराच दिलाय. लॉकडाऊनच्या काळात जन्मदर मोठ्य़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामध्येही  चीन आणि भारत आघाडीवर आहेत

लॉकडाऊन साईट इफेक्ट

 11 मार्च ते 16 डिसेंबर या नऊ महिन्यांमध्ये जगभरात 116 मिलियन मुलं जन्माला येतील. यामध्ये भारतात २ कोटी, चीनमध्ये 1.35 कोटी पाकिस्तानमध्ये 50 लाख,अमेरिकेत  30 लाख मुलांचा जन्म होण्याची शक्यता आहे.

यूएननं कोरोनाच्या काळात गरोदर महिलांच्या आरोग्याबदलही चिंता व्यक्त केलीय. जन्मदरवाढीची समस्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनच्या चिंतेत भर टाकणारी आहे. जन्मदर वाढीच्या या साईड इफेक्टचा सामना करण्याचं पुढील आव्हान या देशांसमोर असेल. 


संबंधित बातम्या

Saam TV Live