Breaking ठाण्यातील वेंदात हाॅस्पीटलमध्ये चौघांचा अचानक मृत्यू; परिसरात तणाव

विकास काटे
सोमवार, 26 एप्रिल 2021

ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील वेदांत या कोविड रुग्णालयात चार जणांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण मृत्यूचे नेमके कारण समजू  शकले नाही. या हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

ठाणे : ठाण्यातील Thane वर्तक नगर Vartak Nagar परिसरातील वेदांत या कोविड रुग्णालयात चार जणांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण मृत्यूचे नेमके कारण समजू  शकले नाही. या हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रुग्णालयात ऑक्सिजन नसल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. Sudden Death Of Four Corona Patients in Thane 

ठाण्यातील वर्तक नगर येथील या खाजगी कोविड Corona रुग्णालयात आज सकाळी अचानक तीन रुग्ण दगावले. ऑक्सिजन Oxygen न मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असताना दुसरीकडे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केले. दगावलेले तिन्ही रुग्ण हे अत्यवस्थ होते असे डावखरे यांना रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. 

रुग्णालयाच्या खाली नातेवाईक आणि मनसे MNS आणि भाजपचे BJP पदाधिकारी जमले असून रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच मृत रुग्णाच्या नातेवाईकांचे बिले घेऊ नये, अशी मागणी डावखरे यांनी केली आहे. मनसेने देखील या मृत्यूंच्या चौकशीची मागणी केली आहे..
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live